खामोना येथे श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

खामोना येथे श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
राजुरा / प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील खामोना येथील विद्यार्थ्यांना श्रमिक एल्गार च्या वतीने विद्यार्थ्यांना श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या हस्ते शैक्षिणक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना संकटात शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नसल्याने गावात अभ्यासिका वर्ग सुरू करून विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न श्रमिक एल्गार संघटनेने सुरू केला आहे.

खामोना येथील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य म्हणून बुक, पेन, रंगकांडी, मास्क, व इतर साहित्य देण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा चे शिक्षक एल. टी. मडावी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दिलेल्या साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी करावा असे आव्हान मेश्राम यांनी केले. यावेळी खामोना येथील गजानन डूमाने, कविता डूमने, संजय बुटले, विकास आत्राम, गुलाब डूमने, नंदू बुटले, समाधान विधाते, दिलीप जेनुरकर, मनोज पादे, इत्यादी नागरिक उपस्थित होते.