'सारथी'ला दिले, 'महाज्योती'लाही द्या! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२०

'सारथी'ला दिले, 'महाज्योती'लाही द्या!📌 महाज्योती बचाव कृती समितीची मागणी

📌 कृती समितीतर्फे राज्यभर ढोल बजाओ आंदोलन
📌 ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी आंदोलननागपूर - शासनाने मराठा समाज व सारथी ला ज्या प्रमाणे निधी दिला त्याचप्रमाणे ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या महाज्योती संस्थेला द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज (ता ६) ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. महाज्योती बचाव कृती समिती तर्फे नागपूर विभागीय समाजकल्याण व महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.

ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी महाज्योती बचाव कृती समिती तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बहुजन विकास मंत्री यांच्या नावे समाज कल्याण उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड, विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या विमुक्तांवर सातत्याने अन्याय करण्यात आला. भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महाज्योती मध्ये अशासकीय सदस्यपदी भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, राज्य शासनाने सारथी आणि मराठा समाजाशी संबंधित संस्थेला ज्याप्रमाणे १२१० कोटी रुपये दिले त्याच धर्तीवर महाज्योती साठी २५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी रुपये, वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठी १६० कोटी रुपये त्वरित जाहीर करण्यात यावे, भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार समाजाला क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे, ओबीसी समाजाची जातीगत जनगणना करण्यात यावी, बार्टी योजनेच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजना, प्रशिक्षण, फेलोशिप त्वरित सुरू करण्यात यावे, क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाख रुपये करण्यात यावी, महाज्योतीत २५ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये केवळ धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना महाज्योतीतील सर्व घटकांना तातडीने लागू कराव्यात, तातडीने महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजने गती देऊन विद्यार्थ्यांना सत्र २०२० - २१ ची शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागण्याचा समावेश होता.
या आंदोलनाला महाज्योती संस्थेचे अशासकीय सदस्य प्रा. दिवाकर गमे, डॉ बबनराव तायवाडे यांनी भेट दिली.
महाज्योती बचाव कृती समिती तर्फे संघर्ष वाहिनीचे मुख्य संघटक श्री दिनानाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, मिलिंद वानखेडे, योगेश बन, खिमेश बढिये, किशोर सायगन, विनोद आकुलवार, अनील राऊत, शेषराव खार्डे, निशा मुंडे, अविनाश बडे, मधुकर गिरी, प्रभाकर मांढरे, विनायक सुर्यवंशी, राजू हारगुडे, अमोल कानारकर, चंद्रशेखर झोटिंग, प्रणाली रंगारी, गजेंद्र चाचरकर, महेश गिरी, ओंकार श्रीखंडे, विश्वनाथ चव्हाण, धीरज भिसीकर, विक्रम परमार, रामा जोगराणा, रणछोड भिमा परमार, प्रेमचंद राठोड, धर्मपाल शेंडे, मुकेश लोखंडे (बॅन्ड), विश्वनाथ बत्तीसे (गोंधळ वाले), गणेश खडके, विनोद दाढे, अशोक धनगावकर, कैलास वरेकर, जयेंद्र चव्हाण, वासुदेव गरवारे आदी ओबीसी व भटक्या विमुक्त चळवळीतील खंदे पदाधिकारी उपस्थित होते.