मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्याची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ ऑक्टोबर २०२०

मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्याची मागणी



  नागपूर/ प्रतिनिधी                                                 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय व विषयनिहाय मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.                                                             
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने आपणास सविनय निवेदन सादर करण्यात येते की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत पण ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. आपणास याविषयी जाणीव आहे कि, राज्यातील ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन, लॅपटॉप, संगणक आदी साधने उपलब्ध नसल्याने व तसेच शहरी भागातील देखील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकडे ही ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे ही बाब विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्ट्रीने अतिशय नुकसानकारक आहे.
                           ग्रामीण भागातील पालकांना आपले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत किंवा नाही हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्वाध्याय पुस्तिका असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून  डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने आपणास आग्रही मागणी करण्यात येते की, कृपया आपण राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्वच विद्यार्थ्यांना वर्गनिहाय व विषयनिहाय स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून द्याव्यात जेणे करून विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळता येईल. सदरील निवेदनावर
पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते,सतिष काळे,प्रा.शेषराव येलेकर,अंबादास रेडे,डाँ.विलास पाटील,राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे,शामराव लवांडे,,वसंत नेरकर,राजेंद्र भोयर,शालिक बोरसे,बंडू डाखरे,प्रल्हाद कर्हाळे,देवेंद्र  टाले,ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव,आर.आर.वांडेकर,के.डी.वाघ,विठ्ठल घायाळ,अनंत मिटकरी,भास्कर शिंदे,पंजाब दांदले, संजय निंबाळकर ,संजय पुंड सुरेंद्र बनसिंगे,संजीव शिंदे,मेघराज गवखरे, हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, सुरज बमनोटे, विजय कांबळे, राजेश मालापुरे,पुप्पा कोंडलवार योगेश कडू,स्वप्नील ठाकरे,विनोद चिकटे,लोकोत्तम बुटले,नंदा वाळके,गुणवंत देव्हाडे,संगीता ठाकरे,प्रिया इंगळे,गजानन कोंगरे प्रवीण मेश्राम, गौरव शिंदे,चेतन चव्हाण,