अल्पवयीन मुलगी व कुमारीकेवर एकाच युवकाने केला अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ ऑक्टोबर २०२०

अल्पवयीन मुलगी व कुमारीकेवर एकाच युवकाने केला अत्याचारभद्रावती पोलिसात गुन्हा दाखल

आरोपी अटकेत

शिरीष उगे (प्रतिनिधी भद्रावती): शहरातील एका अल्पवयीन मुलीवर व कुमारीके वर अत्याचार केल्याची घटना घडली याप्रकरणी भद्रावती पोलिसात गुन्हा दाखल होतात या घटनेतील एकच आरोपी असून त्याला अटक करण्यात आली
यातील सुरज रमेश मून वय 27 राहणार गुरुनगर भद्रावती असे आरोपीचे नाव असून याने 20 ऑक्टोबरला पहिल्या घटनेत मित्रांसोबत वणी येथे गेलेल्या 16 वर्षीय भंगाराम वार्ड येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला धकधपट करून. भद्रावती कडे आणत असताना डोली पेट्रोल पंप समोरील झुडपी जागेत त्या मुलीला नेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला.
दिनांक 21 ऑक्टोंबर ला दुसर्‍या घटनेत सुरक्षा नगर येथे राहणाऱ्या 19 वर्ष कुमारिका घरी असताना हा युवक घरी आला व त्याने तुझ्या भावाला कुणीतरी मारहाण करत आहे तू लवकर चल असे म्हणून तिला गाडीवर बसवून फुकट नगर येथील झुडपी जंगलात घेऊन गेला व तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला या दोन्ही घटनेमधील आरोपी सुरज मून हाच असून फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली पुढील तपास सपोनि संतोष मस्के यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.