पुन्हा एक दुःखद घटना : रानडुकरच्या हल्ल्यात गुराखी ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑक्टोबर २०२०

पुन्हा एक दुःखद घटना : रानडुकरच्या हल्ल्यात गुराखी ठार


चंद्रपूर/प्रतिनिधी
शेगाव पोलीस स्टेशन व ताडोबा बफर झोन अंतर्गत येत असलेल्या बेंबडा येथील शत्रुघ्न गेडाम 54 या गुराख्याचा रानडुक्कर च्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
काल दि 14 तारखेला सायंकाळी सर्व जनावरे घरी आले. परंतु गुराखी न आल्यामुळे शोधाशोध केली . काल त्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे आज पुन्हा शोध घेतला असता रामदेगीजंगलात त्याचा मृतदेह सापडला. वनविभागचे वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण धानकुटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.