जिल्ह्यात दिवसभरात आढळले नवीन ८९ कोरोना बाधित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ ऑक्टोबर २०२०

जिल्ह्यात दिवसभरात आढळले नवीन ८९ कोरोना बाधित

७३ जण कोरोनामुक्त : कोरोनामुक्त रुग्णांचा २ हजाराचा टप्पा पूर्ण
गडचिरोली, ता. १ :  जिल्ह्यात गुरुवारी (ता.१) नवीन ८९ जण कोरोना बाधित आढळले. तर एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ७३ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधित संख्या ८५४ झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित २ हजार ९०७ रुग्णांपैकी २ हजार ३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन ८९ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील ४५ जणांचा समावेश आहे. अहेरी येथील ५, आरमोरी येथील १०, चामोर्शी २, कोरची येथील १, कुरखेडा येथील ३, वडसा येथील १४, एटापल्ली येथील ४, धानोरा येथील ३,  सिरोंचा येथील २ असे एकूण ८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज ७३ जण कोरोनामुक्त झाले असून  यामध्ये गडचिरोलीतील ३२, अहेरी ११,  आरमोरी ९, भामरागड १, चामोर्शी १,  धानोरा २, मुलचेरा १, सिरोंचा २,  कोरची ६, कुरखेडा ४, वडसा ३, एटापल्ली १ असे एकूण ७३ जणांचा समावेश आहे.
आज नवीन ८९ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ४५ जणांमध्ये आशिर्वाद नगर येथील २, बजाज नगर ३, ब्रह्मपुरीवरून दाखल १, बसेरा कॉलनी १, कॅम्प एरिया १, पोलिस संकुल ५, लांजेडा ४, नगर परिषदेजवळ १, शहरातील २, गांधी वॉर्ड येथील ४, गोकुळ नगर १, आयटीआय चौक १, मुरखळा येथील २, चंद्रपूरवरून आलेला १, नवेगाव येथील ४, पोलिस कॉलनी १, रामपूरी वॉर्ड येथील ३, रेड्डी गोडावून येथील १, हनुमान नगर १, सिंधी कॉलनी १, सोनापूर कॉम्प्लेक्स २, वसा १, येवली १, झाशी राणी नगर १ यांचा समावेश आहे. तर अहेरी तालुक्यातील येथील ५ जणांमध्ये शहरातील २, आलापल्ली येथील १, मरपल्ली १ व प्राणहिता १ असे एकूण ५ जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील १० बाधितांमध्ये शहरातील ८, ब्रम्हपुरीचा १, मोहटोला किनाला १ असे एकूण १० जणांचा समावेश आहे. चामोर्शीमध्ये लखमापूर बोरी १, तळोधी १ असा दोघांचा समावेश आहे. धानोरा ३ यामध्ये शहरातील १, कोन्हाटोला १, येरकड १ असे तिघांचा समावेश आहे. तर एटापल्लीमध्ये शहरातील ४ जणांचा समावेश आहे. कोरचीमधील १ जण शहरातीलच आहे. कुरखेडा येथील ३ बाधितांमध्ये शहरातील १, वाडेगाव १ व ऐरंदी १ जणांचा समावेश आहे. सिरोंचा मधील २ ही शहरातीलच आहेत. वडसा येथील १४ बाधितांमध्ये  सीआरपीएफ ५, हनुमान वार्ड १, कमला नगर १, कोरेगाव १, पंचायत समिती १, विसोरा २ व शहरातील ३ जणांचा समावेश आहे.