वाचन प्रेरणा दिनापासून कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑक्टोबर २०२०

वाचन प्रेरणा दिनापासून कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करा

कुही तालुक्यातील शिक्षकांचे तहसीलदारास निवेदन

नागपूर / अरुण कराळे ( खबरबात )
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील शिक्षकांनी कोरोनाच्या कामकाजावर बहीष्कार टाकल्यामुळे हळूहळू कोरोनाच्या कामकाजावर बहीष्कार टाकण्याचे लोन हळूहळू पसरू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ . एपीजे अब्दूल कलाम यांच्या जंयतीच्या निमीत्ताने वाचन प्रेरणा दिनापासून कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त करा अशा आशयाचे निवेदन कुही तालुक्याचे तहसीलदार बाबाराव तिनघसे यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर ( ग्रामीण ) जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांच्या नेतृत्वात दिले . शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना सर्वेक्षणाच्या कामकाजातून कार्यमुक्त करण्यासाठी शासनाने संदर्भाकीत शासन परिपत्रक निर्गमीत केले असतांना कुही तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना  कोरोनाच्या  कामकाजातून अजुनपर्यंत कार्यमुक्त केले नाही . विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत असे असतांना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत पुन्हा सर्वेक्षणाचे कामे दिल्यामुळे शिक्षकामध्ये नाराजीचा सुर आहे . आमचे काम विद्यार्थ्यांना शिकविण्याचे असुन आजही आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातुन शिकवित आहे . अशैक्षणिक कामे आमच्या कडून काढून घ्या असेही निवेदनातून स्पष्ट केले . यावेळी विमाशी संघाचे  जिल्हा उपाध्यक्ष  विष्णु राणे , सहकार्यवाह विजय गोमकर ,  जिल्हा संघटक दत्तराज उमाळे , शंकर पन्नासे ,   प्रकाश भोयर ,किशोर चालखोर,  ,दिगांबर नरूले, राजेंद्र भोयर ,नरेंद्र पिंपरे  ,श्री माैंदेकर  , श्री .गंथाडे  , श्री .डडमल , श्री .तितरमारे , श्री  कोत्तावार , श्री .गुरूनुले , श्री .नारनवरे  . श्री . कहालकर , श्रीमती वंजारी  आदीसह  असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .