चंद्रपूर:बेरोजगारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ ऑक्टोबर २०२०

चंद्रपूर:बेरोजगारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन कार्यशाळाकृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधीवर मार्गदर्शन
चंद्रपूर(खबरबात):
 कृषी क्षेत्रामध्ये बेरोजगारांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळा( वेबिनार) आयोजित केली आहे. सदर कार्यशाळा दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 3.00 ते 4.00 या कालावधीत होणार आहे.

या वेबिनार मध्ये कृषी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर चंद्रपूरचे उपविभागीय कृषी अधिकारी आर. जे. मनोहरे मार्गदर्शन करणार आहे.तर कार्यक्रमाची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे हे देतील.

सदर कार्यक्रम ऑनलाईन असून कार्यक्रमात गरजू युवक-युवतींनी सहभागी होण्याकरिता गुगल मिट व गुगल साईटवर http://meet.google.com/bsk-xcsk-bkp या लिंकचा उपयोग करावा. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.