रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; महा ग्रामीण पञकार संघाचा उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑक्टोबर २०२०

रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; महा ग्रामीण पञकार संघाचा उपक्रमनिफंद्रा- (रविंद्र कूडकावार)
जिल्हयात दररोज २० ते २५ रुग्नांना रक्ताची गरज भासते.कोरोनामुळे नियमीत चालणा-या रक्तदान शिबीराला फटका बसला आहे.ही बाब माहीत होताच सावली येथील महाराष्ट राज्य ग्रामीण पञकार संघ तालुका सावली च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुदधा रक्तदान शिबीराचे आयोजन केले.त्यात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.

           अनेक मोठे रक्तदान शिबीरे कोरोनामुळे आयोजित करण्यात आले नाही.

त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात  खूपच कमी रक्तसाठा निर्माण झाला ही बाब सावली येथील ग्रामीण पञकार संघाला माहीत होताच तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या आवाहानाला प्रतिसाद देत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत रक्तदान शिबीराची सुरवात झाली.तालुक्यातील तरूणांनी रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद दिला.

                अनेकदा गंभीर आजारात व  प्रसूती दरम्यान रक्ताची गरज भासते.कित्येकदा रक्त वेळेवर न मिळाल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता असते.म्हणून या कोरोनाच्या काळात अशा रक्तदान शिबीराची गरज असून या उपक्रमापासुन प्रेरणा घेउुन इतर सुज्ञ व्यक्ती व सामाजिक संघटनांनी अशा शिबीराचे आयोजन करावे असे आवाहन ही पञकार संघाचे वतीने करण्यात आले.

              यावेळी रक्तपेढीचे डॉ. किशोर ताराम, विजय पत्तीवार, नरेश कंदीकुरवार, सुरज चांदेकर व चमु हजर होती.