गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ ऑक्टोबर २०२०

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा

डॉ. प्रकाश आमटे यांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दारूबंदी हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र, जनतेच्या हितासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारू बंद असने गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेऊ नये, असे लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्रात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात  सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिकांच्या पुढाकाराने शासनाने १९९३ मध्ये दारूबंदी कायदा अंमलात आणला. त्यानंतर  गाव पातळीवरही अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपले दारूबंदीला समर्थन असून शासनाने बंदी हटवू नये, अशी मागणी डॉ. प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.