पुन्हा ११९ नवीन कोरोनाबाधित, तर ५१ रुग्ण झाले कोरोनामुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ ऑक्टोबर २०२०

पुन्हा ११९ नवीन कोरोनाबाधित, तर ५१ रुग्ण झाले कोरोनामुक्त

गडचिरोली : गेल्या आठवडयापासून सरासरी शंभरच्या पटीत रुग्णसंख्या वाढत असून बुधवारी (ता.७) पुन्हा ११९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकूण सक्रिय बाधितांमधील आज ५१ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा ९५४ वर पोहचला आहे. आत्तापर्यंतची एकूण कोरोनाबाधित संख्या ३ हजार ५०५ वर पोहचली आहे. तर यापैकी २ हजार ५३० जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७२.१८ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या जिल्ह्यात आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारी २७.२२ असून मृत्यूदर ०.६० टक्के आहे.

बुधवारी नवीन १२९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यात  ५८, अहेरी ९, चामोर्शी ६,  भामरागड १, धानोरा १०, एटापल्ली १० कोरची २, कुरखेडा ६, मुलचेरा १, सिरोंचा २ व वडसा येथील १४ जणांचा समावेश आहे. तसेच  ५१ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २९, आरमोरी ४, भामरागड २, चामोर्शी १, धानोरा १, एटापल्ली १, मुलचेरा १, सिरोंचा २,  कुरखेडा १ व वडसा येथील ९ जणांचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील ५८ बाधितांमध्ये आयटीआय चौक २, गोकुळनगर ४, रामनगर १, सुयोगनगर १, कन्नमवार नगर १, कॅम्प एरिया १, चामोर्शी रस्ता १, चंद्रपूर रोड २, कलेक्टर कॉलनी २, दुर्गा मंदीर चौक १, गांधी वार्ड २, शहर २, विद्यापीठ कॉम्लेक्स १, इतर जिल्ह्यातील ३, कारगिल चौक १, खरपुंडी ४, कुंभीटोला रहिवासी १, कुरूड येथील १, माडेतुकूम १, इतर राज्यातील १, मेडिकल कॉलनी १, नवेगाव ४, एनटीसी होस्टेंल १, बोधली पीएचसी २, पोलिस स्टेशन  २, रामनगर ३, रामपूरी वॉर्ड ५, रेव्हीन्यू कॉलनी १, शिवाजी कॉलनी १, स्नेहानगर १, शिक्षक कॉलनी आयोध्या नगर १, त्रिमुर्ती चौक १, येवली २ जणांचा समावेश आहे.अहेरी तालुक्यात  मध्ये ६ शहरातील आहेत, महागाव, मरपल्ली, प्राणहिता येथील प्रत्येकी एक एक जणाचा समावेश आहे.  भामरागड मधील १ स्थानिक आहे. चामोर्शी मधील ६मध्ये मु. कान्होली १, आष्टी २, घोट १, सोनापूर १, शहरातील १ चा समावेश आहे. धानोरा १०मध्ये चातगाव शोधग्राम ५ व शहरातील ५ जणांचा समावेश आहे. एटापल्ली १० मध्ये सीआरपीएफ ४, तहसिल कार्यालय १, पोलीस २ व ३ स्थानिक आहेत. कोरची २ मध्ये बोटेकसा १ व शहरातील १ जण आहे. कुरखेडा ६ मध्ये १ पुराडा तर बाकी शहरातील आहेत. मुलचेरा १ शहरातीलच आहे. सिरोंचा २ स्थानिक आहेत. वडसा १४ मध्ये भगतसिंग वॉर्ड १, इतर जिल्हा १, सीआरपीएफ ४, गांधी वार्ड २, कासारी १, विसोरा ३ व वडसा  मधील २ जणांचा समावेश आहे.