जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ ऑक्टोबर २०२०

जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा

जलयुक्त शिवार मध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा
माजी मंत्री रमेशचंद्र बंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री यांना विभागीय आयुक्त, व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
हिंगणा विधानसभा क्षेत्रात तत्कालीन शासनाने जलयुक्त शिवार योजनेचे नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करून काही विशिष्ट लोकांना, संस्थांना आर्थिक लाभ पोहोचविण्याचे कार्य केले या सर्व बाबींची एस आय टी मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त संजीव कुमार,व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील हिंगणा तालुका व नागपूर ग्रामीण तालुका येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून त्यात वेना नदीचे खोलीकरण करण्यात आले त्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी, एमआयडीसी हिंगणा, आर्ट ऑफ लिविंग यांचेसह इतर सेवाभावी संस्था व स्थानिक नागरिकांकडून लोकवर्गणी जमा करण्यात आली याच कामाकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत काही निधी दिला परंतु या कामासाठी एकूण खर्च किती व एकूण निधी किती जमा झाला याचा कोणताही हिशोब नाही तसेच सदर काम हे नियमानुसार झाली का? यासाठी सदर ग्रामपंचायत, नगर पंचायत यांचा ठराव घेण्यात आला का? ह्या कामाची गुणवत्ता व दर्जा तपासण्यात आला का? माझी वेना माझी गंगा ही संस्था सदर कामासाठी लोकवर्गणी करण्याकरिता शासनाने अधिकृत केलेली संस्था आहे का? असे प्रश्न निर्माण होत आहे तरी या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे.
तसेच तालुक्यातील रायपुर, जुनेवाणी, डेगमा (बु.), किन्ही (धानोली), हिंगणा, सावंगी (देवळी), पिपळधरा, धोकर्डा,कान्होलीबारा, आधी गावात जलयुक्त शिवार योजनेचे नियमबाह्य कामे करून भ्रष्ट्राचार करण्यात आला. तरी सदर कामाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावे असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सुचिता ठाकरे, वृंदा नागपुरे, राकापा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे, हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, उपसभापती सुषमा कावळे, पंचायत समिती नागपूरचे उपसभापती संजय चिकटे, राकाँपा हिंगणा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, नागपूर तालुकाध्यक्ष संजय कुंटे, विनोद ठाकरे आदी उपस्थित होते.