जि.प. सदस्य दिनेश बंग यांच्या हस्ते दिव्यांग यांना झेरॉक्स मशीन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ ऑक्टोबर २०२०

जि.प. सदस्य दिनेश बंग यांच्या हस्ते दिव्यांग यांना झेरॉक्स मशीन


जि.प. सदस्य दिनेश बंग यांच्या हस्ते दिव्यांग यांना झेरॉक्स मशीन
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगांना स्वयंरोजगाराच्या उद्देशाने डी.बि.टी योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या झेरॉक्स मशीन रायपूर येथील प्रज्ञा सुनील वानखेडे यांना देण्यात आली.
माझ्या मतदार संघातील दिव्यांग बंधू भगिनींसाठी मी सदैव सोबत राहील व त्यांच्या स्वयंरोजगाराचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काम करेल असे लाभार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे,रायपूरचे सरपंच प्रेमलाल भलावी, उपसरपंच दीपावली कोहाड, ग्रामपंचायत सदस्य सिराज शेटे, जावेद महाजन, मुकेश कथलकर, मनीष उमाळे, श्याम चानपूरकर ग्रामसेवक वाभीटकर सुमनबाई जळीत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.