चकमकीत पाच नक्षली ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ ऑक्टोबर २०२०

चकमकीत पाच नक्षली ठार


कोसमी-किसनेली जंगल परिसरातील घटना; नक्षल संघटनेला जबर धक्का

गडचिरोली, ता. १८ :  गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाºया कोसमी-किसनेली जंगल परिसरात आज दुपारी पोलिस व नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत ५ जहाल नक्षलवादी ठार झाल्याने नक्षल संघटनेला जबर धक्का बसला आहे.

 उपविभाग धानोराअंतर्गत येणाºया पोलिस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती खब-यांकडून जिल्हा पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलिस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी-६०  च्या पथकाने ग्यारापत्ती परिसरातील  जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरू केले. दरम्यान कोसमीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सी-६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये ५ नक्षलवादी ठार झाले. या घटनेमुळे नक्षल संघटनेला जबर धक्का बसला असून  कोसमी जंगल परिसरात पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले  आहे.

उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी आपल्या पदाचे सूत्र हाती घेतल्यापासून नक्षलवाद्यांच्या विरोधातली मोठी कारवाई असून जिल्हा पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांनीही आल्या आल्या आपली चुनूक दाखवत नक्षलवाद्यांना मोठा हादरा दिला आहे.