नवजात अभ्रक आढळले; त्या मातेचा पोलीस शोध घेणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० ऑक्टोबर २०२०

नवजात अभ्रक आढळले; त्या मातेचा पोलीस शोध घेणार

 


▪️नविनवस्ती परिसरात खळबळ


 शिरीष उगे (प्रतिनिधी वरोरा):
 नवजात स्त्रीलिंगी अभ्रकापासून पिच्छा सोडविण्यासाठी अभ्रकाला चुपचाप नवीन वस्तीच्या राजीव गांधी वार्डातील झुडपात फेकून पोबारा करणाऱ्या निर्दयी मातेचा शोध पोलीस करीत असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत अभ्रकास ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
अधिक माहितीनुसार शहरातील राजीव गांधी वार्ड नवीन वस्ती येथील मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंतीजवळ असलेल्या खुल्या परिसरात काही मुले खेळत असताना त्यांना भिंतीच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात एक नवजात बाळ मृतावस्थेत आढळले. झाडाझुडपात नवजात अभ्रक असल्याचे कळताच विविध वार्डातील नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाझुडुपांनी वेढलेल्या व कचरा असलेल्या ठिकाणी नवजात बाळ मृतावस्थेत आढळले. बाळाचा जन्म जवळपास १२ ते १६ तासांपूर्वी झाला असावा. त्यामुळे भुकेने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यामुळे एका अविवाहित युवतीने हे नवजात अभ्रक फेकले असावे, अथवा मुलाची लालसा असणाऱ्या परिवाराने मुलगी नको म्हणून अभ्रक फेकले असावे, असा कयास लावला जात आहे. आजकल मोठ्या प्रमाणात सिझर होत असताना ही प्रसूती दवाखान्यात झाली की घरी हा सुद्धा गहनीय मुद्दा ठरु शकतो. या घटनेमध्ये अन्य प्रतिष्ठित व्यक्तीचा समावेश तर नाही ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चहूदिशेने तपासास सुरूवात केली असून नेमके हे कृत्य कोणी केले असेल याचा वरोरा पोलीस शोध घेत आहेत. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
नवजात अभ्रकाला मध्य रात्रीच्या सुमारास झुडपात फेकून पोबारा करणारी ती अनोळखी माता कोण? यावर वरोरा शहरात उलट सुलट चर्चा सुरू आह