समाजकार्य महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२०

समाजकार्य महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सोमकुवर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रुबीना अन्सारी, समाजकार्य विभागाचे प्रा.ओमप्रकाश काश्यप, कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रा. ओमप्रकाश कश्यप यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर डॉ. रुबिना अन्सारी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ.रमेश सोमकुवर यांनी अध्यक्षीय भाषणातून दोन्ही महापुरुषांना आदर्श सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन केले.
संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, तर आभार प्रा. राहुल जुनगरी यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. प्रणाली पाटील, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. मनोज होले, प्रा. निशांत माटे, डॉ. मनीष मुडे, प्रा. आवेशखरणी शेख, कार्यालय अधिक्षक प्रफुल्ल बागडे उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी उज्ज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, वसंता तांबडे, किरण गजभिये यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.