माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे कलाम यांचे जन्मदिन वाचन प्रेरणा दिन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑक्टोबर २०२०

माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे कलाम यांचे जन्मदिन वाचन प्रेरणा दिन
काटोल: प्रतिनिधी
आज गुरुवार दिं 15 ऑक्टोम्बर ला माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे कलाम यांचे जन्मदिन वाचन प्रेरणा दिन साजरा करून त्यानिमित्य स्थानिक शिक्षण संस्थांना पुस्तके भेट देण्यात आली. माजी प्राचार्य स्व चंपतराव बुटे यांना वाचनाची आवड होती.त्याचा लाभ विद्या र्थ्यांना व्हा याकरिता मंथन फौंडेशनचे वतीने त्यांचे संग्रहातील शेकडो पुस्तके विविध शैक्षणिक संस्थांना देण्यात आली . सदर उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवित असल्याचे संयोजक राजेंद्र खामकर यांनी माहिती दिली. आज देशभर वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला . या दिनाचे औचित्य ठेऊन लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य गणेश शेंभेकर व ग्रंथपाल विनायक शेळके यांना जेष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे, मंथन फौंडेशनचे राजेंद्र खामकर, उज्ज्वल मोटघरे, सुधीर बुटे, लाकडे बाबूजी, जेष्ठ लिपिक अशोक वानखेडे, हेमंत नागपुरे, सुभाष पोहोकर, यादव पंधराम, वेद प्रकाश शर्मा आदी उपस्थित होते.स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम- विरेंद्रसिह व्यास

अध्यक्ष बाबा(राजेंद्र) व्यास कला महाविद्यालय कोंढाळी


वाचाल तर वाचाल पुस्तके वाचनाची आवड व शब्द साठा जीवनाचे उन्नतीचा मार्ग दाखवितो. प्राचार्य स्व चंपतराव बुटे सर यांचे वाचनाची पुस्तके विद्यार्थ्याना मिळणे फार मोलाचे असून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्थेला दिलेली पुस्तके भेट ही खरोखर विद्यार्थ्यांना महत्वाची प्राप्ती राहील असे मत बाबा व्यास महाविधलयाचे अध्यक्ष विरेंद्रसिह व्यास यांनी डॉ ऐ पी जी कलाम यांचे वाचन प्रेरणा दिनी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.कार्यक्रमाला प्राचार्य रघटाटे, प्रा घागरे, ग्रंथपाल विजय भोसे, रमेशराव गिरडकर, सुधीर बुटे, रमेशजी पांडे , विजय परिहार,गजानन दारव्हेकर आदी उपस्थित होते. सदर उपक्रम पुढेही सुरू राहील असे संयोजक राजेंद्र खामकर यांनी सांगितले . याप्रसंगी दुर्गाप्रसाद पांडे यांनी मार्गदर्शन केले.