राजुरा तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना धान्य सुरू करा : घनशाम मेश्राम यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑक्टोबर २०२०

राजुरा तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना धान्य सुरू करा : घनशाम मेश्राम यांची मागणीराजुरा/ प्रतिनिधी

राजुरा तालुक्यातील नवीन राशन कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य सुरू करावे अशी मागणी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी तहसीलदार राजुरा यांचेकडे निवेदनातून केली आहे. 

कोरोना चे महामारित अनेकांचे रोजगार बुडाले असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची प्रचंड नुकसान झाली आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तसेच नवीन राशन कार्ड साठी अर्ज केलेल्या व्यक्तींचे आठ दिवसात अर्ज निकाली काढून त्यांना राशन कार्ड देण्यात यावे जेणेकरून तहसील मध्ये जण्यायेण्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड बसणार नाही असेही निवेदनात मेश्राम यांनी नमूद केले आहे. 

चूनाला, विहीरगाव, बामन वाडा, राजुरा, सतरी, चनाखा, पंचाला, सिंधी, नलफडी, मूर्ती, कोहापरा, धानोरा, बेरडी, सोंडो, विरुर, साखरी, सुमठणा, हिरापुर, वरझडी, नोकारी, बैलंपुर, भेंडाला, खांबाडा,  या गावातील गरजू नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य सुरू करावे अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.