चंद्रपूर:क्वारंटाईन सेंटरवर भोजन घोटाळा पार्ट - २:१०० दिवसात २ कोटी रूपयांची कमाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ ऑक्टोबर २०२०

चंद्रपूर:क्वारंटाईन सेंटरवर भोजन घोटाळा पार्ट - २:१०० दिवसात २ कोटी रूपयांची कमाईकोरोना सारख्या आपत्तीमध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागेवर पैसा कमावण्याचा गोरखधंदा 

इन्कम टॅक्स विभागामार्फत 'पेटी कॉन्ट्रॅक्टर'ची चौकशी करण्याची मागणी

चंद्रपूर/खबरबात:

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील क्वारंटाईन सेंटरवर प्रति प्लेट जेवन ११५ रू.,नास्ता ३० रू.व चहा ५ रू.,बिस्किट लहान पुडा २ व मोठा पुडा ५ रू.,पाणी छोटी बाॅटल ६.५० रू. व मोठी बाॅटल १२ रू. दराने पुरविण्याचे काम स्थानिक कंत्राटदार करित होते.अचानक जून महिन्यात  त्यांचे काम बंद करून नागपूरच्या मे.राॅयल आर्किड हाॅटेल्स लि.या एजन्सीला दर वाढवून  काम देण्यात आले व त्यामुळे महानगरपालिकेला आजपर्यंत फक्त  शंभर दिवसात  जास्तीचे ६० लक्ष रुपये मोजावे लागले व भविष्यातही याचा मोठा आर्थिक फटका महानगरपालिकेला बसेल असा आरोप जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी झालेल्या आमसभेत करून दोषी अधिकार्‍यांची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती.

आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे पुन्हा एक गौप्यस्फोट केलेला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून दर वाढवून काम घेतलेल्या रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेड या कंपनीने स्वतः काम न करता स्थानिक कंत्राटदारांना 'पेटी कॉन्ट्रॅक्ट' दिला. मुळ कंत्राटदाराला दोन वेळच्या जेवणापोटी २४८ रुपये,सकाळचा नाश्ता ३६ रुपये, दोन वेळच्या 2 कट चहाचे २० रू.व बिस्कीट वगैरे सर्व धरून ३२० ते ३२५ रुपये मनपाकडून मिळणार आहेत. मात्र मूळ कंत्राटदाराने  दोन वेळचे जेवण,चहा, नाश्ता वगैरे सर्व काही पुरविण्याचे काम फक्त १७४ रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे दिलेले आहे.म्हणजे काहीही न करता मूळ कंत्राटदाराला जागेवर बसून १५० रुपये प्रति व्यक्तीमागे कमाई करीत आहेत.कोरोनाच्या संकटात लहान स्थानिक कंत्राटदारांनी कमी दरामध्ये भोजन पुरवठा केला.

 त्या कंत्राटदारांचे काही बिले चार महिन्यानंतरही थकीत आहेत. मात्र रॉयल ऑर्किड हॉटेल लिमिटेड या कंत्राटदाराची रुपये ४ कोटी रूपयांची बिले तातडीने देण्यात आली.म्हणजेच मुळ कंत्राटदाराला आतापर्यंत जागेवर बसून काहीही न करता पावनेदोन ते दोन कोटी रूपयांचा लाभ झालेला आहे.

नगीनाबाग प्रभागातील एका मंगल कार्यालयामध्ये तीन स्थानिक कंत्राटदार मिळून भोजन तयार करण्याचे काम आहेत.या मंगल कार्यालयाचे मालक तसेच चंद्रपूरच्या कॅटरिंग व्यवसायात नावाजलेले दाताळा रोडवरील अतिभव्य मंगल कार्यालयाचे मालक व 'पाहिजे तेव्हा फोनवर जेवणाची सुविधा देणाऱ्या एका मोठ्या कॅटरर्सच्या मालकाचा भाचा' असे तीन कंत्राटदार मिळून या कामाचे 'पेटी कॉन्टॅक्ट' घेतलेले आहे.पेटी कॉन्ट्रॅक्ट देण्याची अनुमती महानगरपालिकेच्या करारामध्ये नसते.त्यामुळे महानगरपालिके सोबत केलेल्या कराराचे यामध्ये उल्लंघन झालेले आहे.

 तसेच अधिकृत 'पेटी काॅन्ट्रॅक्ट' करता येत नसल्याने मुळ कंत्राटदाराने तोंडी करार केलेला आहे. यामध्ये अनधिकृतपणे पैशांची देवाण-घेवाण  रोख स्वरुपात करण्यात येत असल्याने या गैरप्रकाराची इन्कम टॅक्स चौकशी करण्याची मागणी सुद्धा देशमुख यांनी केलेली आहे.  भोजन पुरवठा घोटाळ्याचे पाळेमुळे उखडून दोषी अधिकारी,पदाधिकारी व कंत्राटदारांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महापौर यांची 'ती' प्रतिक्रिया म्हणजे चंद्रपुरच्या जनतेचा अपमान आहे

चंद्रपुरातील ४ लक्ष नागरिकांच्या वतीने भ्रष्टाचाराच्या विरोधात वारंवार पुरावे देऊनही कारवाई करण्यात येत नाही. मात्र भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलल्याने महापौर संतापल्या संतापलेल्या दिसतात.पप्पू देशमुख 'कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी त्यांना माहिती द्यावी' असे वक्तव्य  त्यांनी आमसभेत केले. त्याप्रमाणे सभागृहाबाहेर 'तो काही जज नाही'अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्यांची भाषा पदाला शोभणार नाही.तसेच हा चंद्रपूरातील सर्वसामान्य नागरिकांचा अपमान असल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली.