जेतवन बुद्ध भूमी येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ ऑक्टोबर २०२०

जेतवन बुद्ध भूमी येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

संजीव बडोले, प्रतिनिधी
नवेगावबांध दि. 14 आक्टोंबर:- येथील प्रशिक बुद्ध विहारात 14 ऑक्टोम्बर रोज बुधवार ला सकाळी नऊ वाजता 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन covid-19 चे प्रोटोकॉल पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंदजी शहारे यांच्या हस्ते प्रशिक बुद्ध विहारा मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .या प्रसंगी नगर बौद्ध समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र साखरे ,कोषाअध्यक्ष देवदास बडोले, शितल राऊत ,भीमाबाई शहारे हे यावेळी उपस्थित होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटले जाते. सकाळी 10.00 वाजता धम्मचक्र प्रवर्तन निमित्ताने नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंदजी शहारे ,त्यांच्या हस्ते जेतवन बुद्ध भूमी येथे पंचशील ध्वजारोहन आणि सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .या प्रसंगी नगर बौद्ध समाजाचे  आनंद जनबंदु,भीमराव मोटघरे ,जगदीश शहारे,बादल शहारे, ठानेराव वैद्य ,बकूबाई शहारे, अंकित शहारे ,संदेश राऊत, सुमित बडोले ,ध्रुप तर्जुले तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते.