नवेगावबांध येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ ऑक्टोबर २०२०

नवेगावबांध येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा




अशोक विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



संजीव बडोले,प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. 25 आक्टोंबर:- येथील प्रशिक बुद्ध विहारात 25 ऑक्टोम्बर रोज रविवारला ला सकाळी नऊ वाजता 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कोविड-19 चे प्रोटोकॉल पाळून विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंदजी शहारे यांच्या हस्ते प्रशिक बुद्ध विहारा मध्ये पंचशील धम्म ध्वजारोहण करण्यात आले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अगरबती आणि मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .या प्रसंगी नगर बौद्ध समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र साखरे ,कोषाअध्यक्ष देवदास बडोले, शितल राऊत, सेवानिवृत्त शिक्षक विठोबा बडोले, भिमाबाई शहारे, भास्कर बडोले ,समता सैनिक दलाचे हेमचंद लाडे हे यावेळी उपस्थित होते.
अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटले जाते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे.
सकाळी नऊ वाजता पंचशील बुद्ध विहार इंदिरानगर येथे श्रीचंद इंदुरकर गुरुजी यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले यावेळी यशवंत बोरकर, हरिचंद्र तर्जुले, कमल घरडे, नंदकिशोर उके, दुर्योधन राऊत कन्हैयालाल राऊत ,माधुरी उके, भागरताबाई साखरे उपस्थित होते.
सकाळी 10.00 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी निमित्ताने नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष रेवचंदजी शहारे ,त्यांच्या हस्ते जेतवन बुद्ध भूमी येथे पंचशील ध्वजारोहन आणि सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .चिंतामण वाघमारे व संचाने जेतवन बुद्ध भूमी येथे संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी नगर बौद्ध समाजाचे आनंद जनबंदु, भीमराव मोटघरे ,जगदीश शहारे,लांजेवार गुरुजी, बादल शहारे, नरेश बडोले, ठानेराव वैद्य ,बकूबाई शहारे,सचिन सांगोळकर, हितेंद्र डोंगरे, अंकित शहारे ,संदेश राऊत,रुपेश सांगोळकर, सुमित बडोले ,ध्रुप तर्जुले तसेच बौद्ध बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.