रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त; एक लाख 15 हजार रुपयांचा दंड - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २३, २०२०

रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त; एक लाख 15 हजार रुपयांचा दंड


तलाठी गस्ती पथकाची कारवाई

रेती चोरांची खैर नाही, तालुक्यात विशेष कारवाई मोहीम
संजीव बडोले/ प्रतिनिधी
नवेगावबांध दि. 23 ऑक्टोंबर:-
तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांनी रेती चोरी करणार्‍या विरुद्ध कारवाई करत बंदया येथे विनापरवाना अवैधरित्या एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ट्रॅक्टर मालकावर 1लाख 15 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई 22 ऑक्टोंबर रोज गुरुवारला करण्यात आली आहे. सदर मालकाने दंडाची रक्कम भरल्यामुळे त्याचा ट्रॅक्टर ट्राली त्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तलाठी गस्ती पथकातील तलाठी पुंडलिक कुंभरे,टेंभरे,निमकर,बिसेन, यांचे पथक गस्त घालत असताना बंध्या महागाव येथे सकाळी 6.20 वाजता प्रदीप आत्माराम मस्के राहणार शिरोली यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35,एजी 8455  ,ट्राली क्रमांक एम एच 35 ,एफ 3168 उमेश देवाजी वघारे राहणार सिरोली हा चालक  अवैधरीत्या विनापरवाना अवैध एक ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळला. तलाठी पथकाने पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये ट्रॅक्टर चालक व मालकावर कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅक्टर मालक प्रदीप आत्माराम मस्के व चालक उमेश देवाजी वघारे यांनी  महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक 18 दिनांक 12 जानेवारी 2018 नुसार कलम 48 (आठ) अन्वय ट्रॅक्टर एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी रक्कम रुपये 1लाख व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2015 चे कलम 48( 7) बाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयीन परिपत्रक दिनांक 11 नोव्हेंबर 2016 अन्वय निर्गमित केलेल्या खनिजाच्या बाजार भावाच्या पाच पट व स्वामित्वधन याप्रमाणे पाच ब्रास रेती चा बाजार भाव रुपये तीन हजार प्रमाणे पाच पंधरा हजार अधिक स्वामित्वधन चारशे रुपये अशी एकूण 1 लाख 15 हजार 400 रुपये दंड ठोठावण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी तहसीलदार विनोद मेश्राम अर्जुनी-मोर यांनी सदर प्रकरण उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्याकडे पाठविले ट्रॅक्टर मालक प्रदीप मस्के यांनी दंडाची रक्कम शासन खजिना जमा केली त्यामुळे रेती जप्त करून खाली ट्रॅक्टर व ट्राली त्यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.  सदर मालकाने दंडाची रक्कम भरल्यामुळे त्याचा ट्रॅक्टर ट्राली त्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.         जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका व भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व साकोली या शेजारच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशी माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील  महालगाव,सुकळी,परसोडी, पळसगाव घाटावरून रेतीची अवैध तस्करी नवेगावबांध ला होत असल्याची माहिती आहे. महालगाव पळसगाव, गोंडउमरी येथील व अन्य ठिकाणचे तसेच काही स्थानिक रेती तस्कर रेती अवैध वाहतुकीचा गोरखधंदा बऱ्याच दिवसापासून करीत असल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालया अंतर्गत  गौणखनिजांची अवैध वाहतूक व चोरी रोखण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी  यांचे 27 गस्ती पथक तहसीलदार अर्जुनी मोरगाव विनोद मेश्राम यांनी नियुक्त केले आहेत. तालुक्यात होणाऱ्या अवैध रेती सारख्या गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांवर हे पथक नजर ठेवून आहेत. त्यामुळे या महसूल विभागाच्या दणक्यामुळे  आता रेती चोरणाऱ्यांची खैर नाही. तालुका अर्जुनी मोरगाव येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे.