काटोल तालुक्यात पाॅझिटीव्ह 1200 पार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ ऑक्टोबर २०२०

काटोल तालुक्यात पाॅझिटीव्ह 1200 पारआज नवे रुग्ण 4, तर आतापर्यत एकूण मृतक 25


सुधीर बुटे/काटोल
तालुक्यात करोना पोसिटीव्ह संख्या बारसे पर्यत पोहचली आहे. दररोज रुग्ण निघाचे प्रमाण कमी जास्त असल्याचे दिसून येते. काटोल शहरात नवरात्रात धूम धडाक्यात असतो. त्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतल्याने रुग्ण संख्या मर्यादित असल्याचे दिसून येते. तरी पण या काळात आकडा वाढतच गेल्याने बारासे पार झाल्याचे तर मृत्यू प्रमाण 20 वरून 25 वर गेल्याचे शासनाचे आकडेवारी दर्शविते. शुक्रवारी काटोल शहरात दोन तर ग्रामीण भागात तीन पोसिटीव्ह रुग्ण मिळाले. यात मोहखेडी ,रिधोरा, राहुलगाव प्रत्येकी एक असल्याची माहिती आरोग्य विभागाचे डॉ सुधीर वाघमारे यांनी दिली. तालुक्यात सध्या एकूण 1201, दुरुस्त 1100 , उपचार 71 तर एकूण मृत 25 असल्याची माहिती तहसील कोविड नियंत्रण कक्षातुन नायब तहसीलदार शैलेंद्र टिपरे यांनी दिली.