'दारूविक्री करणा-यांवर कारवाई करा' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० सप्टेंबर २०२०

'दारूविक्री करणा-यांवर कारवाई करा'

गडचिरोली, ता. ३० : तालुक्यातील मारोडा येथे गाव संघटनेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया पेकिंगकसा व ककार्झोरा येथील दारूविक्रेत्यांना बोलाऊन त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. मात्र, पुन्हा दारूविक्री सुरू केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी मारोडा तंटामुक्त समिती व गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे. यासंदर्भतील निवेदन पोटेगाव मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
मारोडा पूर्णत: दारूमुक्त गाव आहे. मात्र, ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया पेकिंगकसा व ककार्झोरा येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री केली जाते. या गावांमुळे मारोडा येथील शारीरिक व सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे. महिलांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गाव संघटनेने दोन्ही गावांतील दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बैठकीचे आयोजन करून  दोन्ही गावातील दारूविक्रेत्यांना बोलावण्यात आले. यावेळी दारूविक्रेत्यांनी दारूविक्री बंद करण्यासंदर्भातील हमीपत्र दिले.