वेकोलीच्या अतिक्रमण जागेवरून तलवारीने प्राणघातक हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ सप्टेंबर २०२०

वेकोलीच्या अतिक्रमण जागेवरून तलवारीने प्राणघातक हल्ला

▪️ गंभीर जखमी यादव यांची प्रकृती चिंताजनक

शिरीष उगे, प्रतिनिधी (वरोरा/भद्रावती)

भद्रावती तालुक्यातील वेकोली माजरीच्या खाली जागेवर अतिक्रमणच्या वादा वरून ग्रामपंचायत सदस्य व त्याचा भाऊ आणि नातेवाईकाणे बाबू उर्फ अजय यादव युवकावर वर धार धार तलवार चाकू ने हल्ला करून त्याला नालीत फेकून फरार झाले ही घटना आज सकाळी अकरा वाजता च्या दरम्यान ची असून ही घटना माजरी च्या वेकोली रुग्णालया जवळ घडली.यात बाबू उर्फ अजय यादव गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वेकोली माजरी मध्ये अनेक खाली पडलेल्या जागान वर अतिक्रमण सुरू असताना माजरी च्या एलसीएच क्वाटर लगत जागा वर बाबूं उर्फ अजय यादव व त्याच्या मित्रांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले परंतु दिनांक ६ सप्टेंबर २०२० ला माजरी ग्रामपंचायत सदस्य अमित केवट नी एलसीएच क्वाटर 38 नंबर माझा आहे व ही खाली असलेली जागा माझी होणार म्हणून वाद झाला दोघांनी पोलीस स्टेशन गाठले व दोघांना माजरी पोलीस ने समजून घालून अदखल पात्र गुन्हा दाखल सोडून दिले.त्याच दिवशी वेकोली माजरी च्या सुरक्षा अधिकारी ने माजरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली व वेकोली च्या जागेत कोणीही बांधकाम करू नये म्हणून तक्रार दिली या तक्रारी वरून पोलिसांनी सर्वांना नोटीस देऊन वेकोली माजरी जागेचा जो पर्यंत निर्णय नाही तो पर्यंत कोणीही अतिक्रमण करून बांधकाम करू नये असा नोटीस दिला.परंतु दिनांक ९ सप्टेंबर बुधवार च्या रात्री बारा वाजता अमित केवट राजू केवट व त्याचे मित्रानी अजय यादव नी केलेल्या कामाला तोड फोड करून गड्डे बुजवत असताना दिसले आणि दोघांनमध्ये हाणामारी झाली परंतु दोघांनी गुन्हा दाखल होते म्हणुन आपसी समजोता केला परंतु केवट बंधू नी हा वाद न मिटवता आपल्या नातेवाईक च्या मदतीने आज सकाळ ला अजय यादव व त्याचा मित्र अमजीत यादव हे दोघे दवाखान्यात जात असताना दवाखान्याच्या जवळ तलवार चाकूने हल्ला केला त्यात अजय यादव गंभीर जखमी झाला असून त्याला वेकोली रुग्णालयात नेले परंतु प्रकृती जास्त चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर च्या रुग्णालयात दाखल केले परंतु जखमी ची प्रकृती चिंताजनक आहे.