वर्धा नदीत दोघी चुलत बहिणींनी घेतली उङी; एकीचा मृत्यू, एक बचावली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ सप्टेंबर २०२०

वर्धा नदीत दोघी चुलत बहिणींनी घेतली उङी; एकीचा मृत्यू, एक बचावली

घुग्घूस : धरणाचे पाणी सोडल्याने वर्धा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून, या प्रवाहात कोना येथील दोन चुलत बहिणींनी जवळच्या रेल्वे पूलावरून उङी घेतली. ही धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारला सकाळी कावड़ी गावातील नदीच्या काठी त्यातील ज्योती श्रीकॄष्ण परचाके (२०) जिवंत मिळाली तर दुसरी मृत अवस्थेत आढळून आली आहे.

आचल शंकर परचाके (19) आणि ज्योती श्रीकृष्ण परचाके (20) या वणी तालुक्यातील कोना येथील रहिवाशी असून त्या दोघी चुलत बहिणी आहे. गुरुवार दुपारी 2 वाजताच्या दरम्यान गावशेजारून वाहणाऱ्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
दरम्यान वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडल्याने अचानक पाण्याची पातळी वाढली. यावेळी आलेल्या पाण्याच्या जोरदार लोंढ्यात त्या वाहून गेल्या. दि. 11 शुक्रवारी दुपारच्या सुमारास ज्योती बेशुद्धावस्थेत माजरीलगत कावड़ी येथे मासेमारी करणाऱ्यांना आढळून आली.
तिला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर शोध पथकाला आचल हिचा मृतदेह सायंकाळी धोरवासा (तेलवासा) शिवारात आढळून आला. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि मच्छिमारांनी संयुक्तरित्या शोधकार्य केले.
आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी मृत मुलीचे वडील हे जवळपास 15 गावकऱ्यां सोबत घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सय्यद अनवर यांची भेट घेऊन मदद करण्याची विनंती केली असता राजूरेड्डी यांनी वरोरा - भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा ताई धानोरकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेबांना शोधकार्या साठी अतिरिक्त बोटीचे मागणी केली तसेच वणी पोलिसांना ही शक्य तितक्या तत्परतेने शोध घेण्याची विनंती केली. दोन दिवसांपासून उपाशीपोटी मृत मुलीला शोधणाऱ्या गावकऱ्यांच्या नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.