टायगर ग्रुप एटापल्लीतर्फे भव्य रक्तदान शिबीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ सप्टेंबर २०२०

टायगर ग्रुप एटापल्लीतर्फे भव्य रक्तदान शिबीर
एटापल्ली/ वार्ताहर
कोरोनाच्या या महासंकटा मुळे आपल्या देशात महामारी ची वेळ आली आहे, अशा या संकटा मुळे आपल्या अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कमतरतेमुळे, टायगर ग्रुप एटापल्ली तालुकातर्फे दि. ०६|०९|२०२०(रविवार) ला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली इथे रक्तदान शिबीरचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते, रक्तदाना करीत मा.श्री.किशोर गजलवार साहेब (संवर्ग विकास अधिकारी,एटापल्ली) मा.श्री.डॉ.नटवरलाल श्रुंगारे साहेब(वैद्यकीय अधिकारी,ग्रा.रू.एटापल्ली)*, *मा.श्री.महेशभाऊ पुल्लूरवार (अध्यक्ष व्यापारी संघटना एटापल्ली)*, *श्री.सचिनभाऊ मोतकुरवार(सामाजिक कार्यकर्ते)*, *सौ.भावना मॅडम(ग्रामीण रुग्णालय एटापल्ली)*, *श्री. श्रीनिवास पुल्लूरवार सर(शिक्षक एटापल्ली)* *श्री. उमाकांत उपगणलावार काका(जय सेवा मिनी बँक)* यांच्या सह ४२ रक्तवीरानी रक्तदान केले..
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता *टायगर ग्रुप एटापल्ली* तालुक्याचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते।