तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०२०

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा

मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत तहसीलदारांचे निर्देश


 मुलचेरा 2 : दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम (मुक्तिपथ) तालुका समितीची बैठक स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार कपिल हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत तालुक्यातील शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून येणा-या कर्मचा-यांवर, उघड्यावर थुंकणा-यांवर व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असून यावर प्रतिबंध घालणे महत्वाचे आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम तालुका समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व साठवणुकीवर नियंत्रण घालण्यासाठी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये खर्रा खाऊन व दारू पिऊन येणा-या कर्मचा-यांवर दंडात्मक कारवाई करा तसेच व्यसणींना तालुका व्यसन उपचार क्लिंनिकला रेफर करा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना तहसीलदार यांनी बैठकीला उपस्थित सदस्यांना केल्या. यावेळी नप मुख्याधिकारी अजय साबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित मल्लीक, प्रभारी पोलिस निरीक्षक मिलिंद पाठक, आरोग्य पर्यवेक्षक बिश्वास, पंसचे पानारपवार, तालुका कृषि अधिकारी पाटील, समुपदेशक प्रफुल पाल, डॉ. नंदकुमार मानकेळीकर, तालुका संघटक रूपेश अंबादे, तालुका प्रेरक आनंद सिडाम उपस्थित होते.