सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० सप्टेंबर २०२०

सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधननागपूर/ प्रतिनिधी
शहरापासून जवळच असलेल्या वाङी येथील पत्रकार सुनील शेट्टी यांचे कोरोनाने निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 पत्रकारांचे कोरोनानं निधन झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत 200 च्या वरती पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे, 25 च्या आसपास पत्रकार राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.

यातच नागपूर येथील वृत्तपत्र क्षेत्रात मागील अनेक वर्ष मुद्रित शोधक म्हणून कार्यरत सागर जाधव यांचेही कोरोनाने निधन झाले. कोरोना इफेक्ट मुळे त्यांना नोकरी देखील गमवावी लागली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील सकाळचे बातमीदार अरविंद चुनारकर यांचेही दीर्घ आजाराने निधन झाले. 

मागील आठवड्यात पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झाले. पांडुरंग हे टीव्ही ९ मराठीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र २ सप्टेंबरला पहाटे साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केलेल्या पांडुरंग यांनी अनेक मोठ्या मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलं होतं. गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात टीव्ही ९ साठी वार्तांकन करत होते. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुलं आणि पत्नी असा एकूण परिवार आहे.

दोन दिवसापूर्वी पत्रकार संतोष पवार यांचे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना भरती करण्यात आले होते.

सात तारखेला चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार #प्रमोद पेडणेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांना अन्ननलिकेचा त्रास होत होता. रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती.

ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्ग येथील पत्रकार अरविंद  सिरसाठ यांचे निधन झाले.