शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृषी विषयक माहिती पोहोचवा : स्नेहा हरडे यांचे आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ सप्टेंबर २०२०

शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृषी विषयक माहिती पोहोचवा : स्नेहा हरडे यांचे आवाहन

गडचिरोली, ता. १ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण व विविध पिकांवरील कीड, रोग व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादन वाढीसाठी सहकार्य करावे,  आदिवासी अतिदुर्गम भागातील शोतक-यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृषी विषयक माहिती पोहोचविण्याचे आवाहन डॉ. पंजबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कार्यकारी परिषद सदस्य स्रेहा हरडे यांनी केले.
त्यांनी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, वित्ततर कार्यक्रम आदींचा आढावा घेतला. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, विषय विशोषज्ञ डॉ. विक्रम कदम, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण पुष्पक बोधीकर, विषय विशेषज्ञ कृषी हवामानशास्त्र नरेशा बुद्देवार आदी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक मानला जात असून जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील शेक-यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त कृषी विषयक माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषी विज्ञान केंद्राकडून केले जात आहे. शोतकºयांना कृषी विषयक सल्ला, मार्गदर्शन, शेतकरी प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येते. विविध विस्तार कार्यक्रम राबवून शोक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देण्यात येत असल्याने कृषी विज्ञान केंद्राचे स्रेहा हरडे यांनी कौतुक केले. जिल्ह्यातील शेतक-यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी यांत्रिकीकरण व विविध पिकावरील कीड व रोगविषयक माहिती मार्गदर्शान केले. यामुळे नवयुवक शोतक-यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व नवयुवकांचा कल शेतीकडे वळण्यास मदत होईल. शेतकºयांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देवून पिकावरील रोग व कीडीचे निदान करण्याच्या हेतूने त्यांना मार्गदर्शान करावे, शोकºयांना आधुनिक पकी पद्धती, कृषी सल्ला तसेच कृषी विषयक माहिती व मार्गदर्शान करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी केले.
यावेळी लेखा सहायक दीपक चव्हाण, प्रक्षेत्र व्यवस्थापक सुनिता थोटे, हवामान निरिक्षक मोहितकुमार गणवीर, अंकुश ठाकरे, शशिकांत सलामे, प्रविण नामुर्ते आदी उपस्थित होते.