प्रसिद्ध किर्तनकाराचे कोरोनाने निधन; वंचित, निराधारांची केली सेवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२५ सप्टेंबर २०२०

प्रसिद्ध किर्तनकाराचे कोरोनाने निधन; वंचित, निराधारांची केली सेवाराष्ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज, येथे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गाडगे महाराजांच्या विचारांचा अनुयायी आणि एक परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरानंतर सर्वात श्रद्धेय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो वर्षांपूर्वीचे प्रसंग मूर्त्यांच्या रूपाने साकारण्यात आले आहेत. स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ ओळखला जातो. वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते.


पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना अकलूज येथे दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची आज दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.