प्रहार संघटनेचा घंटानाद आंदोलन थेट ग्रामपंचायत कार्यालयावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

प्रहार संघटनेचा घंटानाद आंदोलन थेट ग्रामपंचायत कार्यालयावरपाथरी - दिव्यांग बांधवांना त्यांच्या उद्धारासाठी तसेच त्याची विस्कटलेली आर्थिक घडी व समाजात वावरतांना जीवनमान उंचावे यासाठी शासनाने दिव्यांग बांधवांसाठी पंचायतराज संस्थेच्या उत्पन्नाच्या एकूण 5% राखीव निधी थेट खात्यात जमा करण्याचे 2018 चे आदेश काढत न्याय दिला असून पंचायतराज संस्थेच्या वरिष्ठ ते कनिष्ठ म्हणजेच ग्राम पातळीवरील ग्रामपंचायत कार्यालयाला सक्तीचे आदेश दिले. परंतु पाथरी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील प्रशासनाने आदेशाची पायमल्ली करत निधीचे वाटप केले नाही.
सविस्तर वृत्त असे की , संबंधित आदेशाचे सन्मान करत प्रहार संघटना पाथरी यांनी माहे जून महिन्यात दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी हक्काचे 5% राखीव निधी थेट दिव्यांगाच्या खात्यात जमा करण्याबाबत निवेदन दिले असता त्यावर कोणतेही प्रतिक्रिया न दिल्यामुळे पुन्हा प्रहार संघटनेने सप्टेंबर महिन्यात निवेदन देत 8 दिवसांच्या कालावधीत निधी जमा केली जावी असे निवेदन दिले परंतु उडवाउडवीची उत्तरे देत निधी वितरित केली नाही त्यामुळे प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा हे उद्देश गृहीत धरत ग्रामपंचायत कार्यालय पाथरीवर थेट घंटानाद आंदोलन करीत बधिर झालेल्या प्रशासनाला जागे करून पंचायत समिती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 दिवसाच्या आत दिव्यांग बांधवांची निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले असता जर निधी वितरित झाली नाही तर प्रहार संघटना आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला .
आंदोलन स्थळी प्रहार सेवक प्रफुल तुम्मे, उमाजी भैसारे, कमलेश वानखेडे, मेघराज वालदे, मिथुन मेश्राम, उदय मडावी, अक्षय मडावी,आशिष नेवारे, व इतर प्रहार सेवक प्रहार संघटना पाथरी उपस्थित होते.