जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२१ सप्टेंबर २०२०

जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
वाढदिवसाचा खर्च टाळून किशोर चलाख यांनी केले आयोजन...

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हाध्यक्ष किशोर बळीराम चलाख यांची कन्या कु.समृद्धी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील कवी कवयित्री यांच्यासाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसाचा होणारा निरर्थक खर्च टाळून विजेत्यांना भेटवस्तू देण्याचा संकल्प त्यांनी केला.या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रदीप भुरसे यांचा प्रथम क्रमांक तर कविता आंबोरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.निलेश मानापुरे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे यांनी मार्गदर्शन केले.स्पर्धेचे परीक्षण शामला पंडित यांनी तर संकलन दुशांत निमकर यांनी केले. प्रदीप भुरसे यांनी प्रमाणपत्र निर्मिती केली सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.