आंबिया बहर संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२३ सप्टेंबर २०२०

आंबिया बहर संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या


# उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
# नुकसान सर्वेक्षणाचे आदेश त्वरित काढा राज्य सरकारला मागणी
# केवळ तोंडी आदेश दिले....तालुका प्रतिनिधी
काटोल : संत्राचा कॅलिफोर्निया असलेल्या नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे. पण राज्य शाशन या बाबत उदासीन आहे.संत्रा नैसर्गिक नुकसानाची त्वरित भरपाई ध्या अशी मागणी भाजपा वरिष्ठ पदाधिकारी तथा काटोल न प सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांनी केली आहे. काटोल नरखेड तालुक्यात तसेच संत्रा उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आंबिया बहाराची गळती झाली आहे, तर मृग बहर निसर्गाचे असंतुलनामुळे भरलाच नाही . फार कमी बागा फुलल्या आहे.त्यामुळे नागपुरी संत्रा उत्पादक बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शासनांनी काढलेल्या आदेशानुसार आंबिया संत्रा फळांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. परंतु संत्र्याच्या बागांचे सर्वेक्षण न करण्याचे तोंडी आदेश असल्याचे कर्मचारी सांगत आहेत म्हणून संत्रा फळांचे सर्वेक्षण व्हावे व संत्राउत्पादकांना न्याय मिळावा.
याकरिता आमदार गिरीशजी व्यास, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना निवेदन दिले आहे.