सोशल डिस्टंसीगचे भान ठेऊन नवचैतन्य शारदा उत्सव मंडळाची ऑनलाईन मिटिंग पडली पार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ सप्टेंबर २०२०

सोशल डिस्टंसीगचे भान ठेऊन नवचैतन्य शारदा उत्सव मंडळाची ऑनलाईन मिटिंग पडली पार

चंद्रपुरात ऑनलाईन मिटिंग घेणारे पहिले
 मंडळ ठरले नवचैतन्य शारदा उत्सव मंडळ
चंद्रपूर/खबरबात:
सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे अश्या परिस्थितीत लागल्या हातचे अनेक काम गेली.मात्र वर्षानुवर्षे सुरु असलेली परंपरा मोडायची नाही हा विचार सोबत घेत चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्ड येथील नवचैत्यन्य शारदा उत्सव मंडळाने कोरोनाचे सर्व नियम पाळत मंडळातील सदस्यांची ऑनलाईन मिटिंग घेतली.
यात दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीत शारदा देवी मंडळाने बसवावी आणि यात कोणताही खंड पडू द्यायचा नाही असा निर्णय घेण्यात आला. यासाठी सोशल डिस्टंसीगचे सर्व भाव ठेवत नवरात्रीत देवी बसविणार असल्याचे एकमताने ठरले.  
अगदी सध्या पद्धतीने शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचानांननुसार नवचैत्यन्य शारदा उत्सव मंडळ घटस्थापना करणार आहे.अगदी मोजक्या महत्वाच्या नागरिकांच्या उपस्थितीत हा दहा दिवसीय कार्यक्रम साजरा करणार येणार असल्याचे ऑनलाईन मिटिंगमध्ये ठरले. 
यंदा गणेशोत्सवात पालिकेकडून विविध सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे घटस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतचा सूचनांचा समावेश असणार आहे.