मराठा आरक्षण : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना खासदार श्रीनिवास पाटील यांचे लेखी निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ सप्टेंबर २०२०

मराठा आरक्षण : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना खासदार श्रीनिवास पाटील यांचे लेखी निवेदन
जुन्नर /आनंद कांबळे
मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी गेली दोन दिवस नोटीस देऊन देखील वेळ मिळाली नाही.त्यामुळे यासंदर्भात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ( Narendra Modi ) यांना खासदार श्रीनिवास पाटील यांनी लेखी निवेदन दिले.
यात महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात नाराजी असून याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर केंद्र शासनाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात स्वतःहून सहभाग घेऊन महाराष्ट्र शासन व मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी, ही मागणी पंतप्रधानांना केली आहे.

यापुढेही संसदेतील विविध नियमांचा वापर करून याबाबत बोलता यावे व मराठा समाजाची बाजू मांडता यावी यासाठी प्रयत्न करीत आहे असे ही खासदार पाटील यांनी म्हटले आहे.