धन्वन्तरी नगर व चिटणीस नगरात दहा दिवसांपासून पाणी नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ सप्टेंबर २०२०

धन्वन्तरी नगर व चिटणीस नगरात दहा दिवसांपासून पाणी नाही


राहुल अभंग यांचे ओसीङब्ल्यूच्या अधिका-यांना निवेदन





नागपूर / प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 28 धन्वन्तरी नगर व चिटणीस नगर येथे मागील आठ ते दहा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाही. या संदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी श्रीकुमार नायर यांना राहुल अभंग यांनी निवेदन दिले. लवकरात लवकर पाण्याची समस्या दूर करून लोकांना पानाच्या त्रासापासून दूर करण्याची मागणी करण्यात आली.

धन्वन्तरी नगर या भागात गेल्या पंचवीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यापूर्वी
पाण्यासाठी महानगरपालिका नेहरूनगर झोन व महानगरपालिका नगरसेवकांन यांनाही निवेदन देण्यात आले. परंतु त्यांनीही कोणतीही दखल घेतलेली नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये तापमान असताना पूर्ण वस्तीत पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही. विहिरी व बोरवेल यालाही पाणी लागत नाहीत. या भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळाद्वारे पाणी घेताना चार जणांच्या कुटुंबाला एक दिवसाची गरज भागेल, एवढे पाणी उपलब्ध होत नाही. आता ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा खंङित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा, अशी मागणी राहुल अभंग यांनी केली आहे.