लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० सप्टेंबर २०२०

लॉकडाउन काळात महावितरणकडून विदर्भात ७१ हजार ग्राहकांना नवीन वीज जोडणी

Amnesty scheme for people whose power supply has been permanently  disconnected | Pune News - Times of India
चंद्रपुरात ५४५२ तर गडचिरोली जिल्ह्यात ४,८११८ ग्राहकांना लाभ
नागपूर(खबरबात):
कोरोनामुळे लॉक डाउन झाल्यामुळे सर्वच व्यवहार बंद असतांना या काळात महावितरणने मात्र ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देताना सुमारे २ लाख २२ हजार १७१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे.या काळात विदर्भात एकूण ७१ हजार ४२५ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली त्यात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक १,९७९ वीज जोडण्या या चंद्रपूर विभागात देण्यात आल्या. या विभागात चंद्रपूर शहराचा समावेश होतो. बल्लारशा विभागात १,८७५ आणि वरोरा विभागात १,५९८ वीज जोडण्या देण्यात आल्या. गडचिरीरोली जिल्ह्यात एकूण ४,८१८ वज जोडण्या देण्यात आल्या. आल्लापल्ली विभागात सर्वाधिक १,९२६, ब्रम्हपुरी विभागात १,२७३ आणि गडचिरोली विभागात १,६१९ वीज जोडण्या देण्यात आल्या.

कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉक डाउन लावण्यात आले.त्यामुळे संचारबंदी सारखी परिस्थिती होती. याही काळात सर्व खबरदारी घेऊन जीवाची पर्वा न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत ठेवला. हे करत असतानाच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ज्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी पाहिजे होती, अशा ग्राहकांना तातडीने यंत्रणा उभारून वीज जोडणी दिली.

राज्यात १ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० या काळात विविध योजनेतून २ लाख २२ हजार १७१ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. विदर्भात नागपूर परिमंडलात सर्वाधिक २२ हजार ५३६ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली.अकोला परिमंडलात-१३,९३७, अमरावती-१४,८११, औरंगाबाद-१४,३९०,बारामती-२४,५३७,भांडुप-१८,२५९,चंद्रपूर-१०,२७०,गोंदिया-९,८७२,जळगांव-१६,६२१, कल्याण ३१,२०५,कोकण-७,५१०,कोल्हापूर-२०,२०२,लातूर-१५,६६२ आणि नांदेड परिमंडलात २ हजार ३६९ नवीन ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली.

महावितरण कडून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी www.mahadiscom.in या महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल अँप द्वारे अर्ज करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी घेता येईल.अशी माहिती महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.