प्रकृती बिघडली; आमदार किशोर जोरगेवार उपचारासाठी नागपूरात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ सप्टेंबर २०२०

प्रकृती बिघडली; आमदार किशोर जोरगेवार उपचारासाठी नागपूरात


कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार उपचारासाठी नागपूर रवाना

चंद्रपूर /खबरबात
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार दोन दिवसा पहिले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथेच उपचार घेण्याचे ठरवले मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूरहून नागपूर येथे उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले आहे.ते नागपूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.

त्यांना श्वसनास त्रास आणि गळ्यात खसखस असल्याने त्यांना श्वास घेण्यात देखील अडथळा येत असल्याने त्यांना तत्काळ नागपूर येथे हलविण्यात आले.