मातोश्रीवर धमकीचा फोन; आरोपी गवसला #matoshree #shivsena - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१२ सप्टेंबर २०२०

मातोश्रीवर धमकीचा फोन; आरोपी गवसला #matoshree #shivsena
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करीत

मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यावर दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी आज पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जाणार आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं मह्टलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती.