‘इतनी शक्ती हमें देना दाता’च्या गीतकाराने घेतला जगाचा निरोप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२८ सप्टेंबर २०२०

‘इतनी शक्ती हमें देना दाता’च्या गीतकाराने घेतला जगाचा निरोप

मुंबई : ‘अंकुश’ या चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या गाण्याचे गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांचे यकृत प्रत्यारोपण होऊ शकले नव्हते. दरम्यान, आज (28 सप्टेंबर) पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गीतकार अभिलाष यांनी 1985मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी रचलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देन दाता…’ विशेष गाजली. या प्रार्थनेचा 8 भाषांमध्ये अनुवाद देखील करण्यात आला आहे. आजही अनेक शाळांमध्ये ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेसोबतच अभिलाष यांनी ‘सांझ भई घर आजा’, ‘आज की रात न जा’, ‘वो जो खत मुहब्बत में’, ‘तुम्हारी याद के सागर में’, ‘संसार है इक नदिया’, ‘तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर’ ही गाणी रचली होती.