केंद्राकडून परवानगी न मिळाल्यामुळे चंद्रपूरचा लॉकडाऊन कॅन्सल lockdown chandrapur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२०

केंद्राकडून परवानगी न मिळाल्यामुळे चंद्रपूरचा लॉकडाऊन कॅन्सल lockdown chandrapur


ख़बरबात/चंद्रपुर:Lockdown-chandrapur
29 ऑगस्ट ला मा पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य,. जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय
लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. 

मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूरला लॉकडाऊन होणार यासंदर्भात सर्व माध्यमांवर व सोशल मीडिया वर पोस्ट फिरू लागल्या होत्या मात्र खबरबात ने अशी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन संबंध संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांकडे नव्हती म्हणजे केंद्राने परवानगी नाकारली होती त्यामुळे कोणतेही अधिकारी लॉकडाउन विषयावर बोलायला तयार नव्हते त्यामुळे खबरबात ने देखील पडताळणी करून बघितली असता एकही कागदपत्र या संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या हातात लागला नाही अखेर लॉकडाऊन हा जिल्हा प्रशासनाला कॅन्सल करावा लागला.