भानेगाव येथील कृषीकन्या विद्यार्थीनीने शेतकऱ्यांना केले उपयुक्त मार्गदर्शन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ सप्टेंबर २०२०

भानेगाव येथील कृषीकन्या विद्यार्थीनीने शेतकऱ्यांना केले उपयुक्त मार्गदर्शन
तामसवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद


*खापरखेडा-प्रतिनिधी
परिसरातील भानेगाव येथील कृषीकन्या विद्यार्थी सुकन्या विनोद ठाकरे हि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न अमरावती येथील पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालयात कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे त्यांनी नुकतेच कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत पारशिवनी तालुक्या अंतर्गत असलेल्या तामसवाडी गावातील शेतकऱ्यांना शेतात प्रात्यक्षिक दाखवुन उपयुक्त मार्गदर्शन केले असून सदर कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला.            
कृषीकन्या सुकन्या विनोद ठाकरे ह्या उपासे ले आऊट वार्ड क्रमांक ३ भानेगाव येथील रहिवासी असून त्यांचे वडील विनोद ठाकरे हे परिसरातील महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत फार कमी वेळात सुकन्याने गगनभरारी घेतली आहे तामसवाडी येथे कार्यानुभव कार्यक्रमा दरम्यान
शेतकऱ्याना चारा प्रक्रिया, बीज उत्पादनाचे महत्व व बीज निर्मितीची साधी पद्धत, मृदा परिक्षण व त्यांचे महत्व, किटकनाशक फवारणी करतांना घेण्यात येणारी काळजी व त्याची खबरदारी, कृषी मार्गदर्शन अँपचे महत्व, जैवीक खताची भूमिका, रोपवाटिका व्यवस्थापन, मधमाशी पालन, बँक कर्जमागणी प्रस्ताव, प्रगत सिंचन प्रणाली याविषयी उपस्थित शेकडो शेतकऱ्यांना माहीती दिली यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी येथे कार्यरत कृषी सहाय्यक एस.एन.भोसले व सुनिल बांबल हे आवर्जून उपस्थित होते यादरम्यान कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले यावेळी तालुका कृषी सहाय्यक भोसले व बांबल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सर्वोत्तपरी मदतीचे आश्वासन दिले.       
कार्यक्रमाचे मार्गदर्शक व मुख्यस्त्रोत्र पोटे पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.देशमुख, उपप्राचार्य खाडे, कार्यक्रम समन्वयक प्रा कळसकर वनस्पती रोगनिदान शास्त्र कार्मक्रमाचे अधिकारी डॉं गावंडे  उद्यान विद्यालय प्रा. देशमुख, पशुविज्ञान प्रा.चौधरी वनस्पती शास्त्र प्रा शिंदे, कृषीशास्त्रज्ञ प्रा त्रिपाठी, कृषी अर्थशास्त्र प्रा निंबाळकर, किटकशास्त्र प्रा देशमुख मृदाविज्ञान आदिंचे सुकन्याला सहकार्य लाभले परिसरातील शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केल्यामुळे सुकन्याचे मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, उपमुख्याध्यापक लिखार, आशिष उपासे, राजू ठाकरे, सुनील जालंदर, किशोर बक्सरिया आदींनी अभिनंदन केले आहे.