खेळाडुंनी मेजर ध्यानचंद यांचा बोध घ्यावा : क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०२ सप्टेंबर २०२०

खेळाडुंनी मेजर ध्यानचंद यांचा बोध घ्यावा : क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर

गडचिरोली, 2 : हॉकीचे जादूगर स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळात अतुलनीय कामगिरी केली. खेळाडुंनी त्यांचा बोध घेतल्यास ख-या अर्थाने क्रीडा दिन झाल्याचे सार्थकी लाभेल, असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर यांनी केले. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगर स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संयोजक खुशाल मस्के होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीच्या तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी सारीकोंडा, कनिष्ठ लिपीक विशाल लोणारे, महेंद्र रामटेके, सुनील चंद्रे, कुणाल मानकर व क्रीडा प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयलक्ष्मी सारीकोंडा, क्रीडा अधिकारी राहूल तपाडकर, विशाल लोणारे, महेंद्र रामटेके, सुनील चंद्रे, कुणाल मानकर व क्रीडा प्रेमींनी सहकार्य केले.