शहरात जनता कफ्युर्ला उत्स्फूर्त प्रतिसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ सप्टेंबर २०२०

शहरात जनता कफ्युर्ला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली, ता. २३ :  शहरात  कोरोनाचा वाढता  प्रभाव लक्षात घेता  सर्व संघटनांनी एकत्र येऊन जनता कफ्युर्चे आवाहन केले होते. या आवाहनाला बंदच्या पहिल्या दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गडचिरोली शहरातील फूटपाथ दुकानदार, भाजीपाला, फळविक्रेते, हॉटेल्स, रेस्टारंटसह सर्व व्यापारी प्रतिष्ठाण बंद होते. नेहमी गजबजलेल्या इंदिरा गांधी चौकातही शुकशुकाट दिसून आला.
गडचिरोली शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव बघता  व्यापारी संघटना, फूटपाथ दुकानदार, भाजीपाला, फळविक्रेते, हॉटेल्स, रेस्टारंटसह सर्वपक्षीय नेत्यांनी गडचिरोली शहरात  २३ ते ३०  सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.
या जनता कर्फ्युला गडचिरोली शहरवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला. कोरोना विरुद्धच्या लढाईत आमचा  स्वयंभू सहभाग आहे, हे आजच्या शहरातील बंदच्या परिस्थितीतून दिसून आला.
 बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाºया  सर्व व्यवसायीक, व्यापारी संघटना, फूटपाथ दुकानदार, भाजीपाला, फळविक्रेते, हॉटेल्स, रेस्टारंन्टस मालकांचे आभार सर्वपक्षीय नेत्यांनी मानले असून दिवस बंद पाळून कोरोनावर मात करण्याचे आवाहन केले जात आहे.
शहरात बंदची पाहणी विविध  संघटनांकडून करण्यात आली. सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालये, औषधांची दुकाने, पेट्रोलपंप सुरु होती.