वीज कोसळली; पती-पत्नी ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२०

वीज कोसळली; पती-पत्नी ठार


advt


ब्रह्मपुरी- मुसळधार पाऊस आणि मेघगर्जना सुरू असताना वीज कोसळली. यात पती-पत्नी ठार झालेत.

ब्रह्मपुरी तालुक्यातील पारङगाव येथील दाम्पत्य काही कामासाठी ब्रह्मपुरीला गेले होते. काम आटोपून करून गावाकडे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने जात असताना विजेचा कडकडाटात सुरू असताना भगवती राईस मिल उदापूरजवळ वीज पडून दोघेही पती-पत्नी ठार झाले.
पिंटू मोतीराम राऊत वय ३० व पत्नी गुंजन पिंटू राऊत वय २६ अशी मृतांची नावे आहेत.