मुलापाठोपाठ जन्मदात्यानेही सोङला क्षणातच प्राण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१४ सप्टेंबर २०२०

मुलापाठोपाठ जन्मदात्यानेही सोङला क्षणातच प्राण
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील तुकुम प्रभागाचे माजी नगरसेवक गजानन उर्फ गज्जू चुंचुवार यांचे रविवार 13 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आकस्मिक निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या वङिलांचीही प्रकृती खालावली. त्यापाठोपाठ त्यांचाही मृत्यू झाला.


काँग्रेस मध्ये असतांना आक्रमक नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. तुकूम परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. आज रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना चंद्रपूरात योग्य तो उपचार न मिळाल्याने सायंकाळी तेलंगानात नेत असतांना मंचेरियलच्या जवळपास एम्बुलेंसमध्येच त्यांची प्राणज्योत मालावली. अत्यंत मृदू स्वभावाचे असलेले गजानन चुंचुवार यांच्या मृत्यूने परिसर हळहळला. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसल्याने त्यांचे पिताश्री नारायण चुंचुवार हे पण दगावले.