बनावट नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ सप्टेंबर २०२०

बनावट नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद
जुन्नर / आनंद कांबळे
बनावट नोटा देऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.


  याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील  बाळु कारभारी पवार यांनी फिर्याद दिली आहे की, गेले 15 दिवसांपासून त्यांना बाबासाहेब दाते या इसमाचा वारंवार फोन येत होता व नोटा दिल्यास त्या नोटा लगेच डबल करतो असे सांगत होता. परंतु त्यास नकार देवूनही तो वारंवार फोन करत असल्याने फिर्यादी यांनी आज दि. 01/09/2020 रोजी फिर्यादी यांना पुन्हा फोन करून नारायणगाव हद्दीतील 14 नंबर चौकात समर्थ वडा पाव सेंटरजवळ बोलावून घेतले.

 दुपारी 2.00 वा.सु. इसम नामे (1) बाबासाहेब दाते (2) समीर वाघ (3) प्रमोद साळवे (4) अमोल भोसले पुर्ण नांवे माहिती नाही यांनी पल्सर मोटार सायकल नंबर एम.एच.14/जी.क्यु/5841 वरून येऊन नोटा डबल करून देतो, असे सांगुन फिर्यादीकडुन रोख 25 हजार रूपये घेवुन त्यांना 50 हजार रूपयाचे बंडलवर पुढे व मागील बाजुस प्रत्येकी 1 अशा दोन ख-या नेाटा लावुन बाकीच्या 98 नोटा खोटया देवुन फिर्यादीची 49 हजार रूपयाची फसवणुक केली होती. 
 त्याबाबत नारायणगाव पो.स्टे. येथे गु.रजि.नं. 294/2020, भा.दं.वि.कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
                सदरचा गुन्हा दाखल झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना समजताच त्यांनी गणपती विसर्जन बंदोबस्तास असणारे स्थानिक गुन्हे शाखेतील श्री.रविंद्र मांजरे, सहा.पेालीस निरीक्षक, दत्तात्रय जगताप सहा.पोलीस  उप निरीक्षक,  पो.हवा.शंकर जम, पो.हवा.शरद बांबळे, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना.चंद्रकांत जाधव, पो ना दीपक साबळे, चालक पो.हवा. काशीनाथ राजापुरे यांना गुन्हयातील आरोपी ताब्यात घेणेकामी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर स्थानिक गुन्हे शाखेची टीम व नारायणगाव पो.स्टे. कडील नेमणुकीचे पो.ना. बी. वाय. लोंढे व पो. काॅ. वाय. डी. गारगोटे असे गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता सपोनि श्री. गुंड, नारायणगाव पो.स्टे. यांचे सुचनेप्रमाणे रवाना झाले होते. 
                नमुद पथकाने गुन्हयातील निष्पन्न आरोपींचा गोपनीय बातमीदारांकडून शोध घेऊन 1) प्रमोद भगवान साळवे, 2) बाबासाहेब बापू दाते, 1 व 2 रा. कासारी, ता. पारनेर, जि. अहमदनगर 3) समीर दशरथ वाघ, रा. गुर्वेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, 4) अमोल बन्सी भोसले, रा. भोसलेवाडी-टेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे यांना पाठलाग करून शिताफीने गुन्हयातील मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकलसह पकडून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहेे. पकडलेल्या आरोपींविरूध्द नारायणगाव, जुन्नर,  खेड या पोलीस स्टेशनला खुन, दरोडा, चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
                   त्यापैकी अमोल बन्सी भोसले या आरोपीविरूध्द आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 295/2020, भा.दं.वि. कलम 354, 354(ड), 506, पोस्को कलम 8,12 हा गुन्हा दाखल असून तो गुन्हा केल्यापासून फरार होता.