वनकर्मचा-यांवर फर्नीचर मालकांनी केला हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ सप्टेंबर २०२०

वनकर्मचा-यांवर फर्नीचर मालकांनी केला हल्ला
चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील बाबूपेठ नियत क्षेत्रात बाबूपेठ परिसरात गुप्त माहितीच्या आधारे एम. एम. फर्निचर मार्ट बापूपेठ येथे अवैध लाकडे कटाई होत असल्याची माहिती मिळाल्यावर नियत वनरक्षक श्री व्ही. टी. मंत्रीवार व क्षेत्र सहाय्यक राजेश पाथर्डे आपले दोन मदतनीस सह चौकशी करण्याकरिता गेले असता फर्निचर मार्ट चे मालक श्रीमती कुरेशी, त्यांचे मुले व पती व कारागीर यांनी त्यांच्या तपासणी टीम वर भ्याड हल्ला करून मारहाण केली.

तेव्हा सदर भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना चंद्रपूर जाहीर निषेध करीत असून, हल्ला करणाऱ्या फर्निचर मार्ट चे मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहे.