पालिकेच्या पक्षप्रतोदपदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण यांची नियुक्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ सप्टेंबर २०२०

पालिकेच्या पक्षप्रतोदपदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण यांची नियुक्ती
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व पक्षप्रतोद या पदी ज्येष्ठ नगरसेवक फिरोज मेहबूब खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या नगरपरिषदेतील राष्ट्रवादी चे गटनेते दिनेश दुबे यांचे निधन झाल्याने या रिक्त झालेल्या पदावर फिरोज पठाण यांची गटनेता व पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आलेली आहे पठाण हे 2006 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला 2009 मध्ये उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली होती 2011 ते 2016 या कालावधीत स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षाने संधी दिली 2016च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाच्या चिन्हावर ते जनतेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले माजी आमदार वल्लभ बेनके यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते सर्वांना परिचित आहेत शहरातील विविध सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असतो
_________________________________